Pages

Friday, January 14, 2011

[CM - 1st BirthDay]

 

पतंग उडवताना वीज वाहून नेणाऱ्या प्रचंड क्षमतेच्या तारांशी संपर्क आयुष्यावर बेतू शकतो. त्यामुळे पतंग उडवणाऱ्यांनी वीज तारांचे भान ठेवावे, अस आवाहन 'आरइन्फ्रा'ने केले आहे. 

उच्च दाब क्षमतेच्या वीज तारांचे जाळे उपनगरात पसरलेले आहे. पतंगाचा मांजा हा वीज वाहक असतो. विशेषत: काच मांजासाठी वापरण्यात येणारी काचेची पूड, लोखंडाचा चुरा यामुळे हा मांजा आणखी धोकादायक ठरतो. हा मांजा वीज वाहिन्यांच्या संपर्कात आला तरी त्यातून वीज प्रवाह वाहू शकतो. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची, तसेच गंभीर जखमा होण्याची, प्रसंगी जीवावर बेतण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा कंपनीने दिला आहे. 

वसोर्वा, ओशिवरा, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आदी भागातील लोकांनी यासंदर्भात विशेष दक्ष राहावे, असे आवाहनही करण्यात आले असून, या काळात काही माहिती किंवा मदत हवी असल्यास १८०० २०० ३०३० येथे संपर्क साधावा. 

पक्ष्यांवरील संक्रात टाळा 

धारदार मांज्यामुळे मुक्या चिमण्या आणि इतर पक्षी जखमी होतात. अनेकदा त्यांच्या जीवावरही बेतते. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे पक्ष्यांची संख्या आधीच कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जखमी पक्षी आढळल्यास ९८६७६३३३५५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन 'स्पॅरो शेल्टर'चे प्रमोद माने यांनी केले आहे.

0 comments:

Post a Comment