Pages

Thursday, December 30, 2010

[ChatMasti] आपल्या मोबाईल मधील फाईल्स कशा लपवाल?







आपल्या मोबाईल मधील फाईल्स कशा लपवाल?

अनेकदा मित्रांसोबत असताना आपला मोबाईल आपल्या स्वतःच्या हातात न राहता त्यांच्याच हातात अधिक काळ फिरत

राहतो. अशावेळी मनातून कितीही ईच्छा असली तरी

"तू माझा मोबाईल घेऊ नकोस" असं आपण म्हणूच शकत नाही. असं म्हटल्याने एका छोट्याशा गोष्टिवरुन तो दुखावला जाईल याची आपणास भिती असते. आणि शिवाय त्यात आपलं काही छोटंसं गुपीत आहे यावरही त्यामुळे ओघात शिक्कामोर्तब होतो. म्हणूनच काहिशा अनिच्छेने आपण त्यांच्या हातात आपला मोबाईल सुपुर्त करतो. तो मात्र बेफिकीर असतो, हा त्याचा मोबाईल थोडाच आहे!? हे बटन दाब, ते बटन दाब, प्रायवेट मेसेज वाच, गॅलेरी ओपन करुन फोटो पहात बस, सॉफ्टवेअर्समध्ये शिरुन हे काय?, ते काय? प्रश्न विचारत रहा, गेम्स खेळत बस, तासंतास गाणी ऎक...असं काहीही तो करत राहतो. आणि त्यावर नियंत्रण आणणं ही एक भावनांशी जोडली गेलेली नाजूक गोष्ट असते.


मग यावर काहिच उपाय नाही!? आहे ना! आपल्या प्रायव्हेट फाईल्स हाईड करणं, लपवणं आणि मग आपला मोबाईल बिंधास्त आपल्या मित्राच्या हातात देणं. यासाठी एक अत्यंत चांगलं सॉफ्टवेअर उपलब्ध आहे स्मार्ट गार्ड नावाचं! ब-याचजनांना कदाचीत हे माहितही असेल. पण त्यांना...ज्यांना हे सॉफ्टवेअर माहित नाही, मला एव्हढंच सांगायचं आहे की, हे सॉफ्टवेअर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल कराच. या सॉफ्टवेअरचा उपयोग करुन तुम्ही आपले प्रायव्हेट मेसेजेस, फोटोज, नोट्स, ऑडिओ, व्हिडिओ असं सारं काही पासवर्डच्या साहाय्याने लपवून ठेवू शकता. हंऽऽऽ पण आपला पासवर्ड मात्र जरुर लक्षात ठेवा. कारण तो एकदा सेट केला की, कायमचा तोच रहातो. तुम्ही ते सॉफ्टवेअर अनइंस्टॉल-इंस्टॉल केलंत तरीही. आणि शेवटी पासवर्ड विसरलातच, तर माझ्याशी संपर्क साधा, मी तुमच्या लपवलेल्या फाईल्स स्मार्टगार्डशिवाय ऍक्सेस करण्याचा एक उपाय सांगेन. पण पासवर्ड लक्षात ठेवलेलं कधिही चांगलंच नाही का!

तर मित्राशी असलेले नाजूक बंध जपायचे असतील आणि त्याचबरोबर चिंतामुक्त होऊन त्यांच्या हातात आपला मोबाईलही द्यायचा असेल तर "
स्मार्ट गार्ड मोबाईल सॉफ्टवेअर" तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकेल.







--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
gmail.php.png





--















www.bigoo.ws  www.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.ws
 
 
 

--
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Invite Your Friends - http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe?email=emailid
** Post your Group eMail to - ChatMasti@googlegroups.com
** Submit Your Shayari - http://www.growshine.com/fun.html
** Meet Our Orkut Friends - http://www.orkut.co.in/Main#CommunityJoin?cmm=99312181
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

0 comments:

Post a Comment