Pages

Tuesday, January 4, 2011

[ChatMasti] बँकांमधील नोकरभरती; परीक्षार्थींना मार्गदर्शन





 

सरकारी बँकांतील नोकरभरतीसाठी केंद सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड पर्सोनेल सर्व्हिसेस'ने ('आयबीपीएस') देशभरातून क्लार्क आणि अधिकाऱ्यांच्या हजारो जागा भरण्याचे ठरविले असून, त्यासाठी लेखी परीक्षा व मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन या कर्मचारी महासंघाने मराठी तरुणतरुणींना या स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याची योजना व्यापक प्रमाणावर आखली आहे.

' फेडरेशन' यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे कार्यान्वित करणार आहे. बँकिंग सेवेसाठीची ही परीक्षा देऊ इच्छिणा-या सर्व उमेदवारांसाठी संघटनेने २०० पृष्ठांचे मार्गदर्शनपर पुस्तक छापून तयार केले असून, त्याची किंमत १०० रुपये इतकी अल्प ठेवण्यात आली आहे. हे पुस्तक महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन, ४४, कावसजी पटेल स्ट्रीट, नानाभाई लेन, दादीशेठ बिल्डिंग, फोर्ट, मुंबई-२३ या कार्यालयात दुपारी १ ते रात्री ८ या वेळेत विक्रीसाठी उपलब्ध असेल. हे पुस्तक मुंबईबाहेरसुद्धा महाराष्ट्रात इतरत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जानेवारी ते फेब्रुवारी २०११ या काळात 'फेडरेशन'तर्फे प्रशिक्षणवर्ग चालविण्यात येणार आहेत.

हा उपक्रम यापुढेही चालू राहणार असल्याची माहिती देऊन 'फेडरेशन'चे सरचिटणीस विश्वास उटगी यांनी सांगितले की, १९९३ ते २००८ या काळात केंद सरकारने सरकारी बँकांमध्ये नोकरभरतीवर बंदी आणली होती. सन २००० मध्ये एक लाखाहून अधिक बँक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजना स्वीकारली. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने ('एआयबीईए') केलेल्या प्रखर आंदोलनामुळे २००८ पासून नोकरभरतीला सुरूवात झाली असून, तेव्हापासून सरकारी बँकांमध्ये ४० हजार नवीन कर्मचारी रुजू झाले आहेत. आताच्या नोकरभरतीचा मराठी तरुणतरुणींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7187808.cms
 

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___



--















www.bigoo.ws  www.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.ws
 
 
 

--
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Invite Your Friends - http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe?email=emailid
** Post your Group eMail to - ChatMasti@googlegroups.com
** Submit Your Shayari - http://www.growshine.com/fun.html
** Meet Our Orkut Friends - http://www.orkut.co.in/Main#CommunityJoin?cmm=99312181
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

0 comments:

Post a Comment