कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये
कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर हृदय कधी
तर ते जोडताना असह्य यातना व्हावी ,
डायरित कुणाचे नाव इतकेही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे
अचानक एक दिवस त्या नावाचे
डायरीत येणेच बंद व्हावे ,
स्वप्नात कुणाला इतकेही बघू नये
की अन्धारताही त्याचेच हात असावे,
तुटलीच जर स्वप्न कडी
तर आपल्या हातात काहीहि नसावे,
कुणालाही इतका वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार असावा
एक दिवस आरशात आपणास
आपलाच चेहरा परका दिसावा ,
कुणाचे इतकेही ऐकू नये
की आपल्या कानात त्याच्याच शब्दांचा घूमजाव व्हावा
आणि एक दिवस आपल्याच तोंडातून
त्याच शब्दांचा उच्चार व्हावा ,
पण
कुणाच्या इतकेही दूर जाऊ नये
की आपल्या सावली शिवाय आपल्या सोबत काहीच नसावे
दूर दूरवर आवाज दिला तरी
आपलेच शब्द कानी घुमावेत
किरण अदम
__._,_.___
MARKETPLACE
.
__,_._,___
--
--
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Invite Your Friends - http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe?email=emailid
** Post your Group eMail to - ChatMasti@googlegroups.com
** Submit Your Shayari - http://www.growshine.com/fun.html
** Meet Our Orkut Friends - http://www.orkut.co.in/Main#CommunityJoin?cmm=99312181
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
0 comments:
Post a Comment