सगळ्या प्रेमकथांची सुरुवात
सगळ्या प्रेमकथांची सुरुवात
गोड बोलण्यानेच होते
सगळ्या प्रेमकथांची अखेर
मटार सोलण्यानेच होते!
प्रेमात दोघं असतात तेंव्हा
सगळं गुलाबी वाटत असतं
एकमेकांना प्रेमानं दिलेलं
पाणीही शराबी वाटत असतं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
(तळमजल्यावरून) बादल्या भरून पाणी आणण्यानं होते!
प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा
हात एकमेकांसाठी धरले असतात
दोघंजणं एकमेकांसाठी
राजा-राणी बनले असतात
प्रेमकथांची सुरुवात अशीच
एकमेकांचे हात धरण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
एकमेकांना डच्चू देण्यानं होते!
प्रेमामधे एकमेकांबद्दल
जे जे काही कळलेलं असतं
संसारात त्याच गोष्टींवरून
एकमेकांना छळलं जातं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
कळूनही न कळण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
छळून छळून छळण्याणे होते!
एकमेकांच्या वागण्यामधे
आपल्याला फक्त चुकाच दिसतात
एकमेकांच्या शब्दांमधे
चाबूक आणि बंदुका दिसतात
जे जे कधी होणार नाही वाटतं
ते ते सारं घडत जातं
प्रेमकथेच्या शेवटी शेवटी
सारं काही असं बिघडत जातं
सारं काही असं बिघडत जातं.....
.................... Anand.
--
--
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Invite Your Friends - http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe?email=emailid
** Post your Group eMail to - ChatMasti@googlegroups.com
** Submit Your Shayari - http://www.growshine.com/fun.html
** Meet Our Orkut Friends - http://www.orkut.co.in/Main#CommunityJoin?cmm=99312181
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
0 comments:
Post a Comment