"सामना" वर्तमानपत्रात आलेली बातमी इथे देत आहे.. सर्व गरजू मराठी जनापर्यंत पोहोचवावे हि विनंती. बोरिवलीत शिवसेनेचे रेल्वे भरती मार्गदर्शन शिबीर मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) - भारतीय विद्यार्थी सेना विभाग क्र. १ ने शिवसेना सामाजिक शिक्षण संस्था व पश्चिम रेल्वे लोकाधिकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १० फेब्रुवारी रोजी बोरिवली येथे रेल्वे भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी रेल्वे भरती अर्जाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. सामाजिक शिक्षण संस्थेचे स्टेडियम, जन. करीअप्पा उड्डाणपुलाजवळ, राजेंद्र नगर, बोरिवली (पू.) येथे गुरुवारी सायंकाळी ७ वाजता हे शिबीर होईल. कॉम्पीटिटिव्ह करीअरचे प्रा. विनोद निकम हे मार्गदर्शन करणार आहेत. विश्वस्त संदेश नारकर व पश्चिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष रमेश पालांडे यांनी शिबिराचे आयोजन केले असून विद्यार्थी सेनेचे आमोद गुप्ते, प्रिया पाटील, सचिन म्हात्रे, प्रयेश पाटील, अरुण कुमार दुबे, रमेश गवळी, शेखर जाधव, सुनील मयेकर, अनंत नारकर, संजय मयेकर सहकार्य करीत आहेत. मराठी तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन विद्यार्थी सेनेचे विभाग संघटक शशिकांत झोरे यांनी केले आहे. संपर्क : ९९८७३३२८४८, ९८६९२६२४५६.
|
__._,_.___
.
__,_._,___
--






--
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Invite Friends - http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe?email=emailid
** Post Group eMail to - ChatMasti@googlegroups.com
** Chat With Friends - http://www.growshine.com/chat.html
** Meet Our Orkut Friends - http://www.orkut.co.in/Main#CommunityJoin?cmm=99312181
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
0 comments:
Post a Comment